Home बुलढाणा अभ्यासातील “शिस्त आणि गुणवत्ता विषयावर मातोश्री नाथियाबाई विद्यालयात मार्गदर्शन सत्र

अभ्यासातील “शिस्त आणि गुणवत्ता विषयावर मातोश्री नाथियाबाई विद्यालयात मार्गदर्शन सत्र

0
111

 

जळगांव जामोद( प्रतिनिधी) :-

सुनगांव येथील मातोश्री नाथियाबाई विद्यालय आणि इंग्लिश मिडीयम स्कूल येथे, ‘करिअर अँड रूरल टॅलेंट डेव्हलोपमेंट सेंटर’ अंतर्गत ‘अभ्यासातील शिस्त आणि गुणवत्ता’ या विषयावर माजी गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख मधुकर ढोले यांचे मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. ढोले यांनी शालेय जीवनात शिस्तीचे महत्व, शिक्षणाचा अर्थ आणि हेतू, गुणवत्तापूर्ण अभ्यास याविषयी व्याख्यान दिले. ढोले यांनी गुणवत्तेचे समीकरण मांडत क्षमता आणि प्रभुत्व का आवश्यक आहे याची चर्चा केली. प्रश्नोत्तराच्या माध्यमाने विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. मार्गदर्शन सत्रासाठी अनेक पालकांनीही उपस्थिती लावली होती. शाळेचे मुख्याध्यापक संजय इंगळे यांनी अध्यक्षीय भाषण केले. एकनाथ अढाव, कु. ज्योती खवले आणि कु. मनीषा बाणाईत यांनी समन्वय म्हणून जबाबदारी पार पाडली. सुनगांव सारख्या अती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच करिअर मार्गदर्शन मिळावे यासाठी या मातोश्री नाथियाबाई विद्यालयाचे अध्यक्ष प्रा. डॉ. कुलदीपसिंह दर्यावसिंह राजपूत यांनी ‘करिअर अँड रुरल टॅलेंट डेव्हलपमेंट सेंटर’ ची सुरुवात शाळेमध्ये केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!