जळगांव जामोद(प्रतिनिधी):-
भाजपच्या वतीने प्रियांक खर्गे यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन
स्वातंत्र्यवीर वीर सावरकर यांच्या बद्दल अपशब्द यापुढे सहन केल्या जाणार नाही. असे प्रतिपादन भाजपाचे खामगांव जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी केले.
येथील भाजपा कार्यालयासमोर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री प्रियांक खरगे यांनी काल स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल अपशब्द वापरले.
काँग्रेस पक्षाकडून नेहमी वीर सावरकरांचा अपमान केला जात आहे .आता झालेल्या चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठी हार पत्करावी लागली ,त्यामुळे जनतेला समोर जाण्यासाठी त्यांच्यासमोर कोणताही मुद्दा नाही .त्यामुळे ते वीर सावरकरांचा जाणीवपूर्वक अपमान करत आहेत. आता हा अपमान यापुढे सहन करणार नाही.
असे भाजपा खामगांव जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी यावेळी ठणकावून सांगितले.प्रियांक खरगे यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, विधानसभा निवडणूक प्रमुख गजानन सरोदे, तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष परिक्षीत ठाकरे, प्रदेश सदस्य राजेंद्र गांधी, शाकीर खान, अंबादास निंबाळकर, शुभम चंडाले, चंद्रकांत शिंदे, रामदास बोंबटकार,बाळू पाटील,गोपाल वनारे, राम इंगळे आदी भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी काँग्रेस पार्टी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे व प्रियांक खरगे यांचे विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.














