Home बुलढाणा कोल्हटकर महाविद्यालयामध्ये एड्स जनजागृती कार्यशाळा संपन्न

कोल्हटकर महाविद्यालयामध्ये एड्स जनजागृती कार्यशाळा संपन्न

0
210

 

जळगांव जामोद(प्रतिनिधी):-

स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना पथक व महाविद्यालयातील रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ८ डिसेंबर रोजी एक दिवसीय एड्स जनजागृती कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळे करिता महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था चे बुलढाणा जिल्हा पर्यवेक्षक गजानन देशमुख हे प्रमुख मार्गदर्शनाकरिता उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. डाबरे तसेच मंचावर बी.एस. पटेल महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मोहम्मद नूर हे उपस्थित होते तर ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद चे समुपदेशक श्री बंबटकर तसेच तांत्रिक सहाय्यक कु. कल्याणी कुलकर्णी हे उपस्थित होते.
जिल्हा परिषद श्री गजानन देशमुख यांनी विद्यार्थ्यांना एड्स विषयाबद्दल माहिती देऊन त्याची लक्षणे, तो रोग कशामुळे होतो त्याची कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय या संदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामीण रुग्णालयातील समुपदेशक श्री बंबटकर यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक प्रदीप चव्हाण यांनी एड्स जनजागृती बद्दल विद्यार्थ्यांनी माहिती करून घेऊन समाजामध्ये या रोगासंदर्भात जनजागृती करावी जेणेकरून आपला भारत देश हा एड्स मुक्त होईल असे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी करिता विपुल अडाळे, भारती खोद्रे व इतर विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!