Home बुलढाणा न प मुख्याधिकारी व विद्युत पर्यवेक्षक लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

न प मुख्याधिकारी व विद्युत पर्यवेक्षक लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

0
110

 

जळगांव जामोद(प्रतिनिधी):-

काल दि.14 डिसेंबर 2023 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नगर परिषद चे मुख्याधिकारी व विद्युत पर्यवेक्षक यांना रु 12 हजाराची लाच घेतांना रंगेहात सापळा रचून जाळ्यात अडकविले उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची तसविस सुरू होती.

या तील सविस्तर माहिती की तक्रार दार हा नगरातील पथ दिव्याची देखभाल व दुरुस्ती च्या कामाचे माहे जुलै ,ऑगष्ट, सप्टेंबर चे बिल तसेच त्याने केलेल्या कामाचे बिल अदा केल्याचा मोबदला म्हणून यातील न प चा लोकसेवक (नोकर) दीपक कैलास शेळके वय 30 वर्ष हा विद्युत पर्यवेक्षक वर्ग-3 यांनी स्वतः साठी 6 हजार रु व आ लो से आकाश अविनाश डोईफोडे वय 32 मुख्याधिकारी वर्ग -2 अग्निशमन कॉटर जळगाव जामोद यांच्यासाठी रु 6 हजार ची लाचेची मागणी करीत असल्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांच्या कडे तक्रार दाखल केली होती.

या संबंधी मुख्याधिकारी डोईफोडे यांची पडताडणी केली असता लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती देऊन लाच रक्कम विद्युत पर्यवेक्षक दिपक शेळके यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले सदरची कारवाई पो उप अधिक्षक शितल घोगरे ,पो निरीक्षक सचिन इंगळे,महेश भोपळे, सापळा पथक ए एस आय-भांगे,पो हे कॉ विलास साखरे, प्रवीण बैरागी,रवी दळवी,पो ना जगदीश पवार, विनोद लोखंडे, पो कॉ शैलेश सोनवणे, म पो कॉ स्वाती वाणी, ना पो कॉ नितीन शेटे ,पो कॉ अर्शद शेख सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांनी वरिष्ठ अधिकारी अमरावती यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली सदर लोकसेवकांनी लाचेची रक्कम स्वीकारताच त्यांना ते राहत असलेल्या न प अग्निशमन विभागाच्या कॉर्टर कडे नेण्यात आले होते त्यानंतर पो स्टे मध्ये गुन्हा नोंद करण्याची तजवीज सुरु होती.

हा सापळा यशस्वी झाल्यानंतर इतरही विभागात अशीच कारवाही होण्या विषयी खमंग चर्चा सुरू होती तर काही ठेकेदाराबाबत ही उलटसुलट संताप व्यक्त करत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!