Home बुलढाणा जळगाव जामोद प्रीमिअर लीग सिझन 4 चे आयोजन

जळगाव जामोद प्रीमिअर लीग सिझन 4 चे आयोजन

0
191

 

जळगांव जामोद(प्रतिनिधी):-

जळगाव जामोद प्रीमिअर लीग JPL सिझन 4 लवकर आपल्या भेटीला येणार आहे, मागील JPL चे तीन सत्र बघता यंदाचा JPL महापर्व जानेवारी महिन्यात क्रीडा रसिकांच्या भेटीला येणार आहे, या सत्रामध्ये जळगाव जामोद, संग्रामपूर तसेच शेगाव तालुक्यातील काही भाग ( जळगाव जामोद मतदारसंघात येणारा भाग ) येथील खेळाडू सहभाग घेऊ शकतात… कमिटीतर्फे लवकरच खेळाडूचे फ्रॉम वितरित करण्यात येणार आहे तसेच डिसेंबर महिन्याच्या शेवटी सदर सर्धेचे खेळाडू लिलाव होऊ शकते आणि आगामी जानेवारी महिन्यात स्थानिक कुटे ग्राउंड बायपास रोड, जळगाव जामोद या ठिकाणी होणार आहे, सदर स्पर्धा ही youtube च्या माध्यमातून live राहणार असून जळगाव जामोद मतदारसंघातील जास्तीत जास्त खेळाडूयांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा अशी इच्छा JPL सिझन 4 चे अध्यक्ष म्हणून काम पाहणारे मा. निजाम राज ( सिझन 3 विजयी संघांचे कर्णधार ) यांनी या वेळी व्यक्त केली तसेच स्पर्धेला आता पर्यंत सहकार्य कारणाने मा. हाजी बाबूजी जमदार साहेब, मा. डॉ किशोरजी केला साहेब,मा. संदीपदादा शेळके,मा. निलेशजी शर्मा, मा. आदित्य पाटील यांचे आभार मानले तसेच आगामी स्पर्धाही मा. फरहाण अली खान मुख्य आयोजक जळगाव जामोद प्रीमिअर लिग यांच्या मार्गदर्शनामध्ये होईल ही माहिती JPL सिझन 4 चे अध्यक्ष मा. निजाम राज यांच्या वतीने देण्यात आली….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!