जळगाव जा मध्ये भाजपाकडून
जितेंद्र आव्हाड यांचा निषेध
आ.जितेंद्र आव्हाडांचे हे निंदनीय व निवड कृत्य – सचिन देशमुख
जळगाव जा : प्रतिनिधी
भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण देशवासीयांसाठी दैवतासमान आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ज्या महाड येथील चवदार तळ्याजवळ बाबासाहेबांनी शोषित- वंचितांच्या समान अधिकारांसाठी सत्याग्रह केला त्या चवदार तळ्याजवळच वंदनीय बाबासाहेबांचे छायाचित्र फाडले. अतिशय निंदनीय व संतापजनक असे हे कृत्य असल्याचे मत भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी व्यक्त केले.
या कृत्यातून जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या सडक्या मानसिकतेचे आणि विकृतीचे प्रदर्शन केले आहे. मी जितेंद्र आव्हाडांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.
वंदनीय बाबासाहेबांचा फोटो फाडणे हा केवळ बाबासाहेबांचा अपमान नसून हा त्यांना मानणाऱ्या करोडो देशवासियांचा व बाबासाहेबांनी निर्मिलेल्या ज्या संविधानाच्या पायावर भारतीय लोकशाही आहे त्या संविधानाचा देखील तो अपमान आहे.
आव्हाड हे मूर्ख आणि विवेकभ्रष्ट आहेत. त्यांचे नेते श्री. शरद पवार साहेब दिवसरात्र पुरोगामी भूमिकेचा जप करीत असतात. फुले – शाहू- आंबेडकरांच्या नावावर ते राजकारण करीत असतात. त्यांना सुद्धा नाठाळ आव्हाडांची ही विकृत कृती मान्य आहे का? या आव्हाडांची ते पक्षातून हकालपट्टी करणार आहेत की नाही? या प्रश्नाचे उत्तर पवार साहेबांना या राज्यातील जनतेला द्यावेच लागेल.
आव्हाड यांनी परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांचा केलेला हा अपमान भारतीय जनता पार्टी व या देशातील जनता कधीही विसरणार नाही. या विकृत जितेंद्र आव्हाडांच्या संतापजनक कृतीबद्दल गुरुवारी जळगाव जा येथे भारतीय जनता पार्टी निषेध आंदोलन करून त्यांना धडा शिकवणार असल्याचा ईशारा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी यावेळी दिला.
भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध करण्यात आला.जळगाव जा येथेही भाजपाचे वतीने निषेध करण्यात आला.यावेळी भाजपा प्रदेश सदस्य राजेंद्र गांधी, भाजपा तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ, शहर अध्यक्ष कैलास पाटील,राजू भाऊ उमाळे, निलेश शर्मा,परिक्षीत ठाकरे,अजाबराव पाटील, अनंता गावंडे, महादेव धुर्डे, राधेश्याम जाधव, कैलास राजुस्कर, संजय पांडव,भगवान टापरे, पांडुरंग मिसाळ,अशोक नानगदे, आशिष सारासर, रामा इंगळे, शुभम चंडाले, उमेश येऊल, नितीन ढगे अमोल भगत आदी उपस्थित होते.














