प्रतिनिधी जळगाव जामोद :- अमोल भगत
शहरातील पंचशील नगर मधील रहिवाशी लोकेश दाभाडे अथक प्रयत्नाने विधवा आईचे स्वप्न पूर्ण करत सीआरपीएफ जवान झाला कालच लागलेल्या निकालामध्ये त्याचे सिलेक्शन सीआरपीएफ जवान म्हणून झाले
लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले, त्यांचा अपघाती मृत्यू झाल्या त्यानंतर आई वर्षा दाभाडे यांनी एक मुलगा व एक मुलगी यांचा आपल्या आई-वडिलांच्या सानिध्यात राहून मोलमजुरी करून सांभाळ केला कालांतराने अंगणवाडीमध्ये सेविका या पदावर त्या कार्यरत झाल्या मुलांनी सुद्धा जिद्दी आणि चिकाटीने अभ्यास करून शैक्षणिक प्रगती केली येथील नगर पालिकेच्या अभ्यासिकेत ला तो विद्यार्थी आहे
मुलगी बीएससी ऍग्री झाली तर मुलगा आज सीआरपीएफ जवान झाला लवकरच त्याला जॉइनिंग लेटर मिळेल व तो कर्तव्यावर देश सेवेसाठी तो रुजू होईल














