Home बुलढाणा राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन

राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन

0
116

 

जळगाव जामोद:- प्रतिनिधी अमोल भगत

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित येथील कृषी महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आणि उद्यानविद्या महाविद्यालय, जळगाव (जामोद) यांच्या संयुक्त विद्यमाने (Youth for My Bharat and Youth for Digital Literacy) या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे आयोजन ग्राम-निमखेडी, चारबन व उमापूर येथे दि.29 डिसेंबर 2024 ते 4 जानेवारी 2025 पर्यंत आयोजित करण्यात आले आहे.

राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे महाराज, डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने सुरूवात करण्यात आली.

उद्घाटन कार्यक्रमाला सातपुडा शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ.स्वाती वाकेकर, संचालक डॉ.संदिप वाकेकर, संरपच संघटनेचे अध्यक्ष .राजु सित्रे, उमापुरच्या संरपचा सुलभा रविंद्र वाघमारे, उदयसिंह पटेल, उपसरपंच .ओंकार गौतम,.देविदास डावर, साबीर , रविंद्र वाघमारे, प्राचार्य प्र.राहुल तायडे, उपप्राचार्य प्रा.चद्रशेखर भोपळे, प्रा.अविनाश आटोळे, डॉ.अनिकेत उमाळे, प्रा.सतिश धर्माळ आदी मान्यवर मंचवर उपस्थित होते.

या राष्ट्रीय सेवा योजना शिबीर प्रसंगी डॉ.स्वाती वाकेकर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व आणि विद्यार्थी दशेत असताना समाजाप्रती असलेले कर्तव्य याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. राजू शित्रे पाटील, .उदयसिंह पटेल, देविदास डावर आदी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राहुल तायडे, सुत्रसंचलन प्रा.जिव्हेश साळी व आभारप्रदर्शन प्रा.सतिश धर्माळ यांनी केले.
सदर कार्यक्रमास तीनही महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!