Home बुलढाणा धानोरा येथे महिलेचा विनयभंग…. तालुक्यातील घटनेने एकच खळबळ …… केल्याप्रकरणी आरोपी अटकेत…

धानोरा येथे महिलेचा विनयभंग…. तालुक्यातील घटनेने एकच खळबळ …… केल्याप्रकरणी आरोपी अटकेत…

0
76

 

जळगाव जामोद:- प्रतिनिधी अमोल भगत

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात प्रसिद्ध असे महासिद्ध महाराज तीर्थस्थळ आहे… या ठिकाणी हजारो भाविक भक्त महाराजांच्या दर्शनाकरिता वर्षभरात येतच असतात….तर विशेष म्हणजे अनेक भाविक भक्त शनिवारी रात्री मंदिर परिसरात मुक्कामी असतात…. अशा वेळी मंदीऱ परिसरात मुक्कामी असणाऱ्या भक्ताची सुरक्षा संस्थानाच्या विश्वस्त मंडळावर असते… परंतु स्थानिक विश्वस्त मंडळ ही भक्ताच्या सुरक्षेबाबत अनभिज्ञ असल्याचा धक्कादायक प्रकार धानोरा येथील महासिद्ध महाराज मंदिरात उघडकिस आला आहे…. यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार शनिवार 28 डिसेंबरच्या मध्यरात्री धानोरा येथील महासिद्ध महाराज मंदिरात एका निवासी भक्त महिलेवर भक्तनिवासत अतिप्रसंग करून तिचा विनयभंग केल्याने मंदिरातील महिला भक्तांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे….. राज्यासह संपूर्ण देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत… परंतु सार्वजनिक गर्दीचे ठिकाण आणि मंदिर परिसरात महिलेचा विनयभंग होणे ही कदाचित जळगांव तालुक्यातील पहिलीच वेळ असावी… त्यामुळे मानवी नैतिक मूल्यांची मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे स्पष्ट चित्र या घटनेवरून दिसून येते ….ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा येथील मंदिरात तीस वर्षे महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना ताजी असताना जळगाव जामोद तालुक्यातील महासिद्ध महाराज मंदिर परिसरातील संस्थेच्या हॉलमध्ये एका महिलेवर एका नरधामाने अतिप्रसंग करून तिची अब्रू लुटण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघड झाल्याने मंदिर प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे…. सुदेवाने आजूबाजू झोपलेल्या भक्तांनी वेळेवर धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला .. या संदर्भात पीडित महिलेने जळगाव जामोद पोलिसात तक्रार दाखल केली असून धानोरा येथील आरोपी ज्ञानेश्वर जनार्दन गौर याच्याविरुद्ध कलम 75, 76 BNS गुन्हा दाखल करण्यात आला आहे….. या प्रकारामुळे जळगाव जामोद तालुक्यातील तीर्थस्थळांच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता पोलीस प्रशासनासह मंदिर व्यवस्थापकांनी सुद्धा काळजी घ्यावी व आरोपीस कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी जनतेतून व भाविकांकडून करण्यात येत आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!