Home बुलढाणा अन्न व औषध प्रशासन अमरावती विभागाची धडक कारवाई.. जळगाव जामोद येथे केला...

अन्न व औषध प्रशासन अमरावती विभागाची धडक कारवाई.. जळगाव जामोद येथे केला 25 लाखाचा सुगंधित गुटखा जप्त

0
121

 

जळगांव जामोद(प्रतिनिधी):-
बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव जामोद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अन्न व औषध प्रशासन विभाग अमरावती यांना  मिळालेली  गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून बऱ्हाणपूर रोडवरील रसुलपुर फाटा नजीक बोलेरो पिकप वाहन क्रमांक एम एच 28 बीबी 6887 तसेच 17 लाख 33 हजार 750 रुपयाचा गुटखा असा एकूण 25 लाख 33 हजार 750 रूपयांचा मुद्देमाल जप्त करून, सदर गुटखा व बोलेंरो पिकप वाहन जळगांव जामोद पोलीस स्टेशनला आणून जमा केले.

यामध्ये गुटखा वाहतूक करणारा आरोपी परमेश्वर निर्मळे, देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा, याला जळगांव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. असून त्याच्यावर जळगांव जामोद पोलीस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे संयुक्त दक्षता मुंबई समाधान पवार, सहाय्यक आयुक्त दक्षता आनंद महाजन, सह आयुक्त अमरावती विभाग जयपुरकर, सहाय्यक आयुक्त बुलढाणा केदारे, अन्नसुरक्षा अधिकारी अमरावती विभाग संदीप सूर्यवंशी, गुलाबसिंग वसावे, रवींद्र सोळंके, वाहन चालक देशमुख बाप्पू यांनी पार पाडून पुढील तपास जळगांव जामोद पोलीस स्टेशन चे ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे यांच्याकडे सोपविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!