Home बुलढाणा कोल्हटकर महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

कोल्हटकर महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

0
108

कोल्हटकर महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

 

जळगाव जामोद – प्रतिनिधी

 

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयातील कला व वाणिज्य या दोन्ही शाखेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. वाणिज्य शाखेचा निकाल ९४.५३ टक्के लागला असून कला शाखेच्या निकालाची टक्केवारी ७१.८५ आहे.

वाणिज्य शाखेमध्ये १२८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १२१ विद्यार्थी पास झालेत. त्यामध्ये नऊ विद्यार्थी हे प्राविण्यश्रेणी तर ३९ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत पास झालेत.कला शाखेमध्ये १३५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते पैकी ९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तीन विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तर अकरा विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले आहेत. दोन्ही शाखेतील पहिले तीन क्रमांक मिळवणारे विद्यार्थी असे- वाणिज्य शाखा-प्रथम- पल्लवी प्रकाश माकोडे – ५०९(८४.८३%),द्वितीय – स्नेहल संतोष भोपळे – ४८४ (८०.६७%),तृतीय- वैष्णवी गजानन फाळके – ४८२ (८०.३३%).कला शाखा :- प्रथम – सुप्रिया युवराज वानखडे- ४७६ (७९.३३%), द्वितीय – पूजा गणेश अहिर – ४६० (७६.६७%), तृतीय – साक्षी विनोद अंदुरकर – ४५८ (७६.३३%)

यावेळी जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल यांनी या उत्कृष्ट निकालाबद्दल प्राचार्य डॉ.प्रवीण डाबरे व संस्थेचे सहसचिव मिलिंद जोशी यांचेसह पर्यवेक्षक प्रा.जी.एस.वानखडे,प्रा. ऋषिकेश कांडलकर,प्रा.वसंत चव्हाण,प्रा.विनोद झोपे,प्रा.राजीव देवकर,प्रा.गणेश जोशी,प्रा.डॉ. गिरीश मायी,प्रा.डॉ.ऋषिकेश विप्रदास यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!