Home बुलढाणा चोरी प्रकरणी सराईत आरोपीस अटक आरोपीच्या ताब्यातून मोटरसायकल व कॅश जप्त

चोरी प्रकरणी सराईत आरोपीस अटक आरोपीच्या ताब्यातून मोटरसायकल व कॅश जप्त

0
95

 

जळगाव जा. प्रतिनिधी अमोल भगत

तालुक्यातील सावरगाव येथे दिनांक २८ डिसेंबरच्या रात्री दोन ठिकाणी चोऱ्या झाल्या होत्या. त्यामध्ये शरद पाटील यांचे घराचे वॉल कंपाऊंडच्या आत ठेवलेली शाईन कंपनीची मोटरसायकल क्रमांक एमएच २८ बीएल ९१७१ व तेथीलच तुषार पाटील यांच्या दु‌कानाचे शटर तोडून ४ हजार रुपये कॅश चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली होती. यातील अट्टल गुन्हेगाराला पालिसांनी अटक केली आहे.

चोरी प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात अप.नं ७४९/२०२४ कलम ३०५, ३३४(१) ३ (५) भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरी प्रकरणी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शोध घेण्याचा प्रयत्न केला असता गोराळा धरण शिवारामध्ये चोरांचा सुगावा लागला. यावेळी तपास अधिकारी पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश शेगोकार यांनी वरिष्ठ
अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे यांना याबद्दल माहिती दिली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश शेगोकार व पोलीस कॉन्स्टेबल मधुकर गाढे यांनी गोराळा धरण येथे जाऊन आरोपीच्या ताब्यातून शाईन कंपनीची मोटरसायकल व नगदी १ हजार रुपये व चार वेगवेगळ्या कंपनीचे सिम कार्ड जप्त करून एका आरोपीस अटक केली. तसेच एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. पकडलेल्या आरोपीचे नाव मानसिंग भैड्या वय २८ वर्षे राहणार कहूपट्टा तालुका जळगाव जामोद याला अटक करण्यात आली आहे. मानसिंग भैड्या हा सराईत गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्यास तडीपार सुद्धा केले आहे. सदरची
कारवाई ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी कारवाई यशस्वीरित्या पार पाडली.
आज दिनांक २ जानेवारी रोजी आरोपी मानसिंग भैड्या याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ जानेवारी पर्यंत पीसीआर दिला आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश शेगोकार यांनी या अगोदरही जामोद येथे असतांना सुद्धा ९ मोटरसायकलींसह २ आरोपींना अटक केली होती व मोठा चोरीचा गुन्हा उघड केला होता. सावरगाव चोरी प्रकरणातील चोरटे सापडले असले तरी इतरही चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी अद्याप फरार आहेत त्यांचा शोध सुरू असून अद्याप पर्यंत चोरांचा सुगावा पोलिसांना लागला नाही हे विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!