श्री बालाजी सार्वजनिक वाचनालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा संपन्न
जळगांव जामोद प्रतिनिधी
‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत वाचन संस्कृती’ वाढवण्यासाठी दि. १ ते १५ जानेवारी या
पंधरवाड्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून स्थानिक श्री बालाजी सार्वजनिक वाचनालय, जळगाव जामोद येथे दि. १२ जाने. ला वाचकांचा मेळावा आयोजीत करण्यात आला. वाचनाचे महत्व अनन्यसाधारण असून त्याव्दारेच प्रगती करता येते. विद्यार्थी जीवनात तर वाचन हाच – मुख्य पाया आहे. वाचनामुळे व्यक्ती ‘बहुश्रुत’ बनते आणि तीचा सर्वांगीण विकास होतो, असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले.
सर्वप्रथम स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या व राष्ट्रमाता जीजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून
अभिवादन करण्यात आले.
प्रत्येकाने दिवसातून किमान १ तास वेळ वाचनासाठी देवून या वाचनालयातील उत्तमोत्तम ग्रंथांचा परिसस्पर्श आपल्या उज्वल जीवनासाठी करून घेवून आपले जीवन ज्ञानसमृद्ध व संस्कारक्षम करून घ्यावे असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापक मारोती हागे
यांनी केले. शिवाय वाचनालयामधील दैनिके,
साप्ताहिके आणि मासिके यांचे वाचन करून आपले ज्ञान अद्ययावत ठेवावे असे आवाहन
सेवनिवृत्त मधुकर भोरे
यांनी केले. या कार्यक्रमासाठी अनेक वाचक आवर्जून उपस्थित होते.
यामध्ये सचिव अजय गिरजापूरे ऍड शशिकांत गुप्ता विशाल भगत विकास गिरजापूरे, जयंत मंडवगडे प्रफुल बंबटकार, हरिष चौधरी, प्रवीण चौधरी, प्रशांत गुप्ता बाल वाचकात अबीर भगत,विश्वेश भगत, कनक गिरजापूरे, स्वरूप गिरजापूरे ह्या बालवाचंकाचा सह वाचक व नागरिकाचा सहभाग होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास गिरजापूरे यांनी तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल अमोल भगत यांनी केले.














