Home बुलढाणा महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ निवडणूकीत प्रसेनजीत पाटिल यांचा प्रचंड मतांनी विजय

महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ निवडणूकीत प्रसेनजीत पाटिल यांचा प्रचंड मतांनी विजय

0
117

 

जळगाव जामोद(प्रतिनिधी):-

मंत्री गिरीष महाजन यांच्या निकटर्तीयांना
धोबीपछाड.

महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ, मुंबई निवडणूक 2023-24 मतदान 7 जानेवारी 2024 रोजी पार पडली.

17 संचालक मंडळामध्ये 13 लोक अविरोध म्हणून निवडून आले होते. खामगाव झोन मधून गेली 3 टर्म संचालक असलेले प्रसेनजीत पाटिल यांनी माजी आमदार धृपतराव सावळे यांच्यासाठी माघार घेऊन त्यांना झोन मधून अविरोध दिले.

संपूर्ण राज्यातून असलेल्या ईतर मागासवर्गीय (ओबीसी ) मतदारसंघातून निवडणूकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या विरोधात मंत्री गिरीष महाजन यांचे निकटवर्तीय तथा जामनेर भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कार व अजित पवार गटाचे उदगीर (लातुर ) येथील भरत चामले हे प्रतिस्पर्धी उमेदवार होते.

मंत्री गिरीष महाजन यांनी राज्यभर असलेली संघटनेची, सत्तेची ताकद व मतदान तारखेच्या आधी भरत चामले यांनी बाविस्कार यांना दिलेला पाठींबा यामुळे हि निवडणूक अटीतटीची होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती.

7 जानेवारी 2024 रोजी झालेल्या निवडणूकीत 11 झोन आणि 23 जिल्ह्यातून 207 मतदारां पैकी 184 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आज 9 जानेवारी 2024 रोजी झालेल्या मतमोजणीत प्रसेनजीत पाटिल यांना 109 मते , चंद्रकांत बाविस्कार यांना 75 मते, भरत चामले यांना 0 मते मिळाली.

प्रसेनजीत पाटिल यांनी गिरीष महाजन यांचे निकटवर्तीय चंद्रकांत बाविस्कार यांचा 34 मतांनी पराभव करीत विजय संपदान केला. विजयानंतर त्यांनी जयंतराव पाटिल, अशोकराव चव्हाण, विजय वड्डेटीवार,अनिलबाबू देशमुख, ,एकनाथरावजी खडसे,यशोमती ठाकुर,राजेश टोपे, प्रतापराव जाधव, डॉ. राजेंद्र शिंगणे,सुनिल केदार, सुरेशराव वरपुडकर, कुणाल पाटिल, सुभाष धोटे, अशोकराव पवार, हर्षवर्धन (भैय्यासाहेब) देशमुख, संतोष कोरपे,सुभाषराव ठाकरे, रमेश बंग, सुरेश देशमुख, संजय देशमुख, धृपतराव सावळे, प्रफुल मानकर, प्रविणभाऊ मानकर, अनंतराव देशमुख, शिरीष धोत्रे, वसंतराव घुईखेडकर, माणिकराव शिंदे तथा शेतकरी सहकार आघाडीच्या सर्व संचालक मंडळाचे आभार व्यक्त केले.

विजयानंतर नागपूर तथा जळगाव जामोद येथे फटाके फोडून विजयी जल्लोष साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!