Home बुलढाणा राष्ट्रीय युवा दिनानिमित्त कोल्हटकर महाविद्यालयामध्ये सामूहिक सूर्यनमस्कार

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त कोल्हटकर महाविद्यालयामध्ये सामूहिक सूर्यनमस्कार

0
119

 

जळगांव जामोद (प्रतिनिधी):-

स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकाद्वारे तसेच रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये सूर्यनमस्कार यज्ञाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. डाबरे यांनी सूर्यनमस्काराबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयामध्ये सूर्यनमस्कार यज्ञाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद या महामानवानबद्दल जळगांव शिक्षण मंडळाचे सहसचिव मिलिंद जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यानंतर महाविद्यालयातील उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक बंधू, भगिनी तसेच महाविद्यालयातील इतर कर्मचारी वर्ग यांनी सामूहिक सूर्यनमस्कार केले. या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील 250 विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगांव शिक्षण मंडळाचे सचिव अनुपजी पुरानिक हे होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी रोज व्यायाम करावा व आपले आरोग्य सुदृढ ठेवावे असे आवाहन केले. या सूर्यनमस्कार यज्ञा सोबतच ‘विकसित युवा विकसित भारत’ या थीम वर आधारित वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. चव्हाण प्रा. गवई व इतर विद्यार्थ्यांनी यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!