युवा समाजसेवक डॉ.सतिश शिरेकार यांचा असंख्य कार्यकर्त्यांनसह अकोला येथे वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर पक्षप्रवेश
जळगाव जामोद:- प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज,फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे वंचित बहुजन आघाडी चे सर्वासर्वे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते युवा समाजसेवक डॉ.सतिश शिरेकार यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह जाहीर पक्षप्रवेश झाला
गेल्या बारा वर्षापासून वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव तालुक्यातील सर्व सामान्य जनतेची आरोग्य सेवा करत आहेत. त्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाचे सामाजिक प्रश्न असतील आणि इतर कुठले प्रश्न सोडवायचा झालं म्हणजे सर्वसामान्य जनतेपुढे आपलासा एकच चेहरा दिसतो, तो म्हणजे युवकांचे प्रेरणास्थान डॉ. शिरेकार यांचा.
डॉ. सतिश शिरेकार यांना कुठलाही राजकीय वारसा नसताना सुद्धा प्रत्येक जनसामान्य माणसाने डॉ. शिरेकार यांनी राजकीय क्षेत्रामध्ये येण्याची अपेक्षा व्यक्त केली.
डॉ. शिरेकार हे छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांना प्रेरित झालेले व्यक्तिमत्व आहे.
त्याच्यामुळे गेल्या 4 महिन्यापासून वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाच्या बॅनरखाली त्यांनी पक्षासाठी आणि पक्ष वाढीसाठी ते अथक परिश्रम घेत आहेत
जळगाव जामोद ,संग्रामपूर शेगाव या तिन्ही तालुक्यांमध्ये त्यांचं सामाजिक क्षेत्रात चांगलं काम असल्यामुळे त्यांची तिन्ही तालुक्यांमध्ये लोकप्रियतेचा प्रभाव खूप जास्त आहे.
त्याच्यामुळे तिन्ही तालुक्यातील ज्येष्ठ ,युवा ,सर्व सामाजिक क्षेत्रात काम करणारे 650-700 कार्यकर्ते ,पदाधिकारी, यांनी जळगाव जामोद येथील डॉ. सतिश प्रल्हाद शिरेकार यांच्या विचाराला प्रेरित होऊन स्वयंस्फूर्तीने डॉ. शिरेकार यांच्यासह श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते व बुलढाणा वंचित बहुजन आघाडी प्रभारी श्री.प्रदीपजी वानखेडे,पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष शरदजी वसतकर, वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हाअध्यक्ष देवाभाऊ हिवराळे,वंचित बहुजन आघाडी पश्चिम विदर्भ महासचिव श्री.बालमुकुंची भिरड,जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब दामोदर, जिल्हा समन्वयक अनिलजी अमलकार, महिला जिल्हाध्यक्ष बुलढाणा विशाखा ताई सावंग, जिल्हा उपाध्यक्ष पार्वताबाई इंगळे यांच्या उपसथितीमध्ये वंचित बहुजन आघाडी या पक्षात प्रवेश घेतला यावेळी ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्ष प्रवेशानंतर महासिद्ध महाराज यांच्या दर्शनानंतर ,छत्रपती शिवाजी महाराज ,बोधिसत्व गौतम बुद्ध ,क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालां हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ. शिरेकार यांनी घेतलेल्या राजकीय ठाम भूमिकेमुळे मतदार संघात राजकीय नेतृत्व बदल होण्याची दाट शक्यता आहे .असे सर्व जण सामान्य माणसात बोलल्या जात आहे.














