रोजंदारी वनमजुरांची वनसेवक पदावर सामावून घेण्याची मागणी- आ.डॉ. कुटे यांना निवेदन
संग्रामपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या वनखात्यात वनसेवक (वनमजूर) १२,९९१ भरती
करतांना विना अट यापुर्वी वनकामगारांना शासन सेवेत जसे समाविष्ट केले आहे. त्याप्रमाणे सध्या कार्यरत असलेल्या अनुभवी रोजंदारी वन मजूराना विना अट वनसेवक या पदावर सामावून घेण्यात यावे अशी मागणी रोजंदारी वनमजूर वनपरिक्षेत्र कार्यालय सोनाळा (वन्यजीव) यांनी आ. डॉ. संजय कुटे यांना एका निवेदनाव्दारे केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, वन्यजीव सोनाळा या वनपरिक्षेत्रमध्ये वर्षानुवर्ष अल्पशा रोजंदारीवर दिवस-रात्र जंगलामध्ये मुक्कामी राहून काम करीत आहोत. आमचा अनुभव लक्षात घेऊन
प्राधान्य भरतीमध्ये वनसेवक या पदावर सामावून घेण्यात यावे. आम्हाला बीट व कं. नंबर याची माहिती, बीटची सीमारेषा, सीमारेषा, परिक्षेत्र सीमारेषा याची माहिती. रस्ते, नद्या नाले याची माहिती. झाडांची ओळख व सखोल माहिती. प्रोटेक्शन कॅम्प, तपासणी नाका याची माहिती. जंगलाचे वन- वनव्यापासून संरक्षण करणे. जंगलामध्ये गस्त करून वन संपत्तीचे संरक्षण करणे व प्राण्यांचे शिकारी पासून संरक्षण करणे व आम्ही सर्व रोजंदारी वनमजूर जंगलामध्ये,
प्रोटेक्शन कॅम्प, तपासणी नाका, इको सायंस पार्क, वन विश्राम गृह (रेस्ट हाउस), येथे दिवस-राट्रा म वर्तुळक्कामी राहून कामे करतो. याकरिता सर्व रोजंदारी मजूर अनुभवी असल्याने त्यांना कोणतीही अट न लावता सध्या वनसेवक या पदावर सामावून कायम करण्यात यावे. अशी मागणी निवेदनात करण्यात त आली आहे.
निवेदनावर खुभासिग बद्री डावर, देविदास एकनाथ वावर, अनिल इमाम केदार, सुमित पालकर, रामा डावर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.














