Home बुलढाणा बसस्थानकावर विद्यार्थ्यांचे हाल, बसेसचा तुटवडा उद्भवल्याने विद्यार्थी तात्कळले

बसस्थानकावर विद्यार्थ्यांचे हाल, बसेसचा तुटवडा उद्भवल्याने विद्यार्थी तात्कळले

0
95

बसस्थानकावर विद्यार्थ्यांचे हाल,

बसेसचा तुटवडा उद्भवल्याने
विद्यार्थी तात्कळले

जळगाव जामोद :- प्रतिनिधी

आज येथे संध्याकाळी
बसेस कमी असल्यामुळे, शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनी येथील बस स्थानकावर घरी जाण्यासाठी बसेसची वाट बघत तात्काळत बसले होते. कित्येक विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी नियत वेळी बस न लागल्याने संध्याकाळी पाच ते सातच्या सुमारास शाळा सुटल्यावर संपूर्ण बस स्थानक विद्यार्थ्यांनी गच्च भरून गेले होते आणि माहिती मिळवली असता सदर डेपोतून काही बसेस बुलढाणा पाठवण्यात आल्यामुळे नियमित फेऱ्यांवर त्याचा परीणाम झाला तसेच नियोजन शून्य कामामुळे विद्यार्थांना नेहमीच कियेत तास तातकळत उभे राहावे लागते आणि त्यामुळे इतकी गर्दी झाली. यापैकी काही विद्यार्थ्यांनी एकत्र येत गजानन वाघ यांना आम्हाला काहीतरी मदत करा असा गराळा घातल व सर्वांनी गजानन वाघ यांच्याशी चर्चा करून बसेस उपलब्ध
करून देण्याची मागणी केली.
त्यावेळी गजानन वाघ यांनी डेपो मॅनेजर आणि इतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधत लवकरात लवकर बस उपलब्ध करून देण्याची सूचना दिली. यावेळी सर्व विद्यार्थिनींनी व विद्यार्थ्यांनी गजानन वाघ यांच्याकडे समस्यांचा मोठा पाढाच वाचला आणि त्यांना दररोज होणाऱ्या अडचणी सांगितल्या. आमच्याकडे कोणीही लक्ष देत नाही पहिल्यांदा कोणी राजकीय व्यक्ती बस स्थानकामध्ये येऊन आमची घरी पोहोचण्याची चिंता केली अशी भावना व्यक्त करत त्यांचे धन्यवाद मानले. गजानन वाघ यांनी प्रत्येक विद्यार्थी हा माझ्या मुलासारखा असल्याचे मत व्यक्त करत प्रत्येक तरुणी किंवा विद्यार्थिनी ही वेळेवर तिच्या घरी पोहोचावी यासाठी आपण सर्वांसह आगार व्यवस्थापनाने ही तितकीच जबाबदारी घ्यावी असा आग्रह धरला.
तर या पुढे घडल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला
याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे अशी चर्चा जनमानसात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!