Home बुलढाणा टाळ मृदंगाच्या गजरात दुमदुमली जळगाव नगरी

टाळ मृदंगाच्या गजरात दुमदुमली जळगाव नगरी

0
123

टाळ मृदंगाच्या गजरात दुमदुमली जळगाव नगरी –

जळगाव जामोद (प्रतिनिधी) :-

महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त शहरातील महादेव मारुती संस्थान येथे समाज बांधवांच्या उपस्थितीत आमसभा घेण्यात आली. त्यामध्ये सर्वानुमते डॉ.सतिश प्रल्हाद शिरेकार यांना अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी नऊ वाजता समाजातील सर्व सुज्ञ नागरिक प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या उपस्थितीत अध्यक्षांच्या वतीने हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संध्याकाळी ठीक सहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती येथून शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली. तिथून माळी खेल महात्मा फुले चौक चावडी दुर्गा चौक जुना भाजी बाजार असा शोभा यात्रेचा मार्ग होता. सदर शोभायात्री मध्ये वारकरी संप्रदायाच्या मदतीने टाळकरी, अश्वारूढ रथामध्ये महात्मा फुले यांची आकर्षक मूर्ती ठेवण्यात आली. या शोभा यात्रेला सांप्रदायिक आणि धार्मिक श्रद्धेची जोड असल्यामुळे जळगाव जामोद तालुक्यामध्ये डॉ.सतिश प्रल्हाद शिरेकार यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या शोभायात्रीची जनसामान्यात भूतो न भविष्य अशी शोभायात्रा काढण्यात आल्यामुळे जनसामान्यात चर्चा रंगली आहे. सदर शोभायात्रे मध्ये, मा.आ. कृष्णराव इंगळे ,स्वाती वाकेकर, रामदास बंबटकार,संदीप वाकेकर,प्रसेंजित पाटील गजानन वाघ,ऍड, खिरोडकर,यशवंत उमरकर जेष्ठ पत्रकार कांडलकर , प्रा.आमले डॉ. उमरकर,डॉ खिरोडकर, तसेच समस्त फुले शाहू आंबेडकर विचारवंत, माळी खेल,गोबजी खेल,रामनगर ,कृष्णा नगर ,खेडावेस,सुनगाव वेस,प्रेम नगर,गोविंदपुरा येथील सर्व ज्येष्ठ युवा समाजबांधव यांच्या विशेष सहकार्याने ही शोभायात्रा काढण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!