Home बुलढाणा तीन राज्यामध्ये भाजपाचा विजयाचा जल्लोष साजरा

तीन राज्यामध्ये भाजपाचा विजयाचा जल्लोष साजरा

0
131

जळगांव जामोद (प्रतिनिधी):-
नुकत्याच झालेल्या 4 राज्यातील निवडणूकीचा निर्णय जाहीर झाले त्यात 4 पैकी 3 राज्यात भाजपा ला  बहुमत मिळाले त्याचा आनंद म्हणून येथील आ.डॉ. संजय कुटे, सचिन देशमुख जिल्हा अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये दुर्गा चौक येथे मोठ्या उत्साहाने फटाके फोडून व पेढे वाटून व फुलांची उधळण करत आनंद साजरा करण्यात आला यावेळी “भारत माता की जय”, “वंदे मातरम'”च्या घोषणा देण्यात आल्या यावेळी
सचिन देशमुख जिल्हा अध्यक्ष भाजपा,
आ.डॉ संजय कुटे, डॉ अपर्णा कुटे, गुणवंत कपले,अभिमन्यू भगत,निलेश शर्मा, उमेश येउल, अनिल जयस्वाल, गजानन सरोदे व भाजपाचे सर्व आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!