Home बुलढाणा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात मतदार नोंदणी जागृती अभियान संपन्न.

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात मतदार नोंदणी जागृती अभियान संपन्न.

0
133

 

जळगांव जामोद (प्रतिनिधी):-

शासनाच्या मतदार नोंदणी अभियानाअंतर्गत कोल्हटकर महाविद्यालयामध्ये मतदार नोंदणीचा दुसरा टप्पा उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचे मार्गदर्शनामध्ये घेण्यात आला.मतदार नोंदणीच्या राष्ट्रीय कार्यामध्ये सहभाग म्हणून श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग व मतदार साक्षरता मंडळ व कनिष्ठ महाविद्यालयामार्फत मतदार नोंदणीचे अभियान चालू आहे.

मतदार नोंदणी अभियानाचे समन्वयक तथा राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.निलेश निंबाळकर व कनिष्ठ महाविद्यालयाचे मतदार नोंदणी समन्वयक प्रा.ऋषिकेश कांडलकर यांनी कोल्हटकर महाविद्यालयामध्ये वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयात एक जानेवारी २०२४ पर्यंत ज्या विद्यार्थ्यांची वयाची १८ वर्षे पूर्ण होतात त्यांची नवीन मतदार नोंदणी करण्यात आली.

या अभियानाचा पहिला टप्पा दोन महिन्यापूर्वी पार पडला असून त्यामध्ये १३५ विद्यार्थ्यांनी आपली नवीन मतदार नोंदणी पूर्ण केली तर या दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदारांसाठी फॉर्मचे वाटप करण्यात आले असून ५० विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपले नवीन मतदान नोंदणी केली.

यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.प्रवीण डाबरे,प्रभारी अधीक्षक संजय गाडेकर,अभिजीत माटे,जळगाव शिक्षण मंडळ सहसचिव मिलिंद जोशी,प्रा डॉ गिरीष मायी,प्रा.प्रदीप चव्हाण, प्रा.गिरीश कुलकर्णी,गजानन वानखडे,बाबुराव चव्हाण,समाधान नीलजे, हर्षद धर्मे यांची या कामी सहकार्य लाभत आहे.

मतदार नोंदणी सोबतच मतदार जागृती अभियाना अंतर्गत महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग व मतदार साक्षरता मंडळाद्वारे रांगोळी स्पर्धा,निबंध स्पर्धा,मतदार जागृती प्रभात फेरीचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते या सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!