रासायनिक खतांची झालीले दरवाढ शेतकऱ्यांना मरणाच्या यातना देणारी ….
भूमिपुत्रांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे धाव घेत निषेध नोंदविला निवेदन दिलेव दरवाढ कमी करण्याची केली मागणी
जळगाव जामोद :- प्रतिनिधी
खरंतर भारत या देशाची ओळख कृषिप्रधान देश म्हणून आहे या देशात बहुतांश लोक शेती करतात मात्र शेतकऱ्यांना शेती ही उत्पन्ना पेक्षा खर्च जास्त असल्यामुळे नपरवडणारी झाली आहे.
गेल्या दोन-चार दिवसात रासायनिक खतांचे दर हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आसतांना रासायनिक खते खरेदी करणे शेतकऱ्यांना न परवडणारेच आहे कारण शेतीमालाचे भाव हे जैसे थे आहे. मात्र रासायनिक खतांची दरवाढ ही वर्षाकाठी जोमाने वाटत असल्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त होताना दिसत आहे.
एका दाण्याचे हजार दाणे करत असताना शेतकऱ्यांना शेतीची उत्पन्न वाढवण्यासाठी रासायनिक खताचा पिकांना पुरवठा करावा लागतो आणि त्यात जर दिवसेंदिवस रासायनिक खतांची दरवाढ होत असेल तर ही दरवाजा शेतकऱ्यांना मरणाच्या दारात लोटणारी आहे.
ही मागणी घेऊन आज ७ / ५ / २०२४ ला भूमिपुत्रांनी उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्याकडे जाऊन खताची झालेल्या दरवाढीचा निवेदनाद्वारे निषेध नोंदवला व शेतकऱ्याच्या भावनेचा आदर करत तात्काळ वाढलेली रासायनिक खताची दरवाढ कमी करण्यात यावी अशी मागणी युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या नेतृत्वामध्ये केली.
खालील प्रमाणे वाढले रासायनिक खतांचे दर..
खताचे नाव जुने दर नवे दर
१०-२६-२६ १४७० १७००
२०-२०-०-१३ १२५० १४००
२४-२४-० १५५० १७००
सुपर ५०० ५५०
यावेळी अश्पाक देशमुख, अजय गिरी, वैभव जाणे, सोपान पाटील, सदाशिव जाणे, संतोष गणगे, विष्णू पाटील, सोपान तायडे, तसेच बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.














