सालई गोंध अवैधरित्या जमा करण्याच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी मागीतली होती लाच..
आरोपी वनपाल अँन्टि करप्शन ब्युरोच्या जाळ्यात…
जळगाव जामोद:- प्रतिनिधी
वनपरिक्षेत्र अधिकारी,(प्रादेशिक) कार्यालय, जळगाव जामोद येथे वनविभागाचा सालई गोंद अवैध रित्या जमा करण्याबाबतचा गुन्हा दाखल असून त्या गुन्हयात आरोपी न करण्यासाठी कलीम शेख, वनपाल वनपरिक्षेत्र अधिकारी, (प्रादेशिक) कार्यालय, जळगाव जामोद यानी १०,०००/- रुपये लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांच्या कडे केली होती. त्यानुसार दिनांक ०६.०५.२०२४ रोजी लाचमागणी पडताळणी कार्यवाही केली असता,आरोपी कलीम शेख, वनपाल यांनी पंचा समक्ष १०,०००/- रुपये लाचेची मागणी केली,दरम्यान तक्रारदार यांचेकडून १०,०००/- रूपये लाच रक्कम स्विकारतांना धनपाल शेख यास रंगेहात पकडण्यात आले आहे.आरोपी वनपाल शेख विरुद्ध पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाही १.मारुती जगताप, पोलीस अधिक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, अमरावती, परिक्षेत्र, अमरावती २.अनिल पवार, अप्पर पोलीस अधिक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो अमरावती, परिक्षेत्र अमरावती.यांचे मार्गदर्शनाखाली सदरची कारवाही श्रीमती शितल घोगरे, पोलीस उपअधिक्षक अँन्टी करप्शन ब्युरो बुलढाणा, पोलीस निरीक्षक सचिन इंगळे अँन्टी करप्शन ब्युरो बुलढाणा, सफौ शाम भांगे, पोहेकॉ प्रविण बैरागी, नापोकॉ विनोद लोखंडे, जगदीश पवार, पोकॉ रंजीत व्यवहारे व चालक नापोकॉ नितीन शेटे व अर्शद शेख यांनी पार पाडली. शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अँन्टी करप्शन व्यरो बुलढाणा कार्यालय दुरध्वनी कमांक ०७२६२-२४२५४८ व ९६५७०६६४५५ तसेच टोल फि कमांक १०६४ यावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपअधिक्षक अँन्टी करप्शन ब्युरो बुलढाणा यांनी केले आहे.














