कोल्हटकर महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
जळगाव जामोद:-प्रतिनिधी
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात बारावीच्या परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रवीण डाबरे हे अध्यक्षस्थानी होते तर जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल,सचिव अनुप पुराणिक,सहसचिव मिलिंद जोशी,पर्यवेक्षक प्रा.जी.एस.वानखडे व अधीक्षक संजय गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी वर्ग बारावी वाणिज्य व कला शाखेतील सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये पल्लवी प्रकाश माकोडे, स्नेहल संतोष भोपळे ,वैष्णवी गजानन फाळके, निकिता गजानन हागे,अनुराधा रामदास म्हसाळ, सुप्रिया युवराज वानखडे,पूजा गणेश अहिर,साक्षी विनोद अंदुरकर,प्राची निंबाजी भालतडक,प्रियंका गणेश तायडे,श्रेया भारत भातुरकर, प्रतीक प्रकाश सातव ,रोहिणी वसंत हागे ,शुभांगी राजाभाऊ कुटे, वृषाली रमेश शेळके,आकांक्षा बाळू प्रधान,उज्वला रवींद्र घुले,सरला निनाजी रत्नपारखी,स्नेहा विजय भोपळे,नयना संजय इंगळे,नेहा शंकर मानकर, रेणुका गजानन दंडे,पूजा रमेश मिसाळ व सानिका गणेश राऊत यांचा समावेश होता.बारावीचा उत्कृष्ट निकाल लागल्याबद्दल कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
समारंभाचे संचालन प्रा. गणेश जोशी यांनी प्रास्ताविक जी.एस. वानखडे यांनी तर आभार प्रा. आर.एस.देवकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.ऋषिकेश कांडलकर ,प्रा.वसंत चव्हाण,प्रा.विनोद झोपे,प्रा.व्ही.पी.बावस्कर,प्रा. आर.एस.सायखेडे,प्रा.आकाश निलजे,प्रा.रामेश्वर फाळके,प्रा.नीलिमा भोपळे,प्रा.भाग्यश्री जाणे,प्रा. डॉ.गिरीष मायी, प्रा.डॉ.ऋषिकेश विप्रदास ,प्रा. अर्चना जोशी,समाधान निलजे, गजानन वानखडे, योगेश तायडे ,मानसी कुलकर्णी यांनी सहकार्य केले.














