जळगांव जामोद(प्रतिनिधी):-
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व जळगाव जामोद पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने शहरातील देवाशिष लॉन्स येथे पत्रकारांचे खुले अधिवेशन 4 जानेवारी ला आयोजित करण्यात आले आहे या अधिवेशनासंदर्भात पत्रकारांची आढावा बैठक अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दत्तू दांडगे तालुका अध्यक्ष यांच्या निवासस्थानी आसलगाव येथे पार पडली अधिवेशनासंदर्भात नियोजन वर चर्चा करण्यात आली यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संघटक अभिमन्यू भगत ,
जिल्हाध्यक्ष अनुप गवळी, जिल्हाध्यक्ष प्रदीप मोरे, महाराष्ट्र प्रदेश कार्यालय प्रतिनिधी मंगेश राजनकर, देविदास तायडे, राजकुमार भड , गुलाबराव इंगळे, प्रीतम ठाकुर, शमीम देशमुख, संतोष कुलथे,आश्विन राजपूत, गणेश भड ,गजानन सोनटक्के,अमोल भगत, मनीष ताडे, राजीव वाढे, संजय दांडगे,वासुदेव राजनकार, गजानन खिरोडकार, गोपाल अवचार ,श्रीधर आव्हेकर,
संतोष मांजरे,अनिल भगत अमर तायडे,जफर खान,मंगल काकडे, राहुल निर्मळ ,राजू बाठे,
विजय वानखडे, लियाकत खान,शिवदास सोनोने,अमर तायडे, योगेश म्हसाळ,अनिल दांडगे इत्यादी पत्रकार यावेळेस उपस्थित होते.














